कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर

कृषि उत्पन्न बाजार समिती, पंढरपूरची स्थापना दि.१३/६/१९४७ मध्ये होऊन प्रत्यक्ष कामकाजास दि. १/१/१९४९ पासुन सुरुवात झालेली आहे संपुर्ण पंढरपूर लाल्लुका या चाजार समितीचे कार्यक्षेत्र असुन पंढरपूर शहरामध्ये ४० एकर जागेमध्ये मुख्य कार्यालय कार्यरत आहे. भंडीशेगांव, करकंब व भाळवणी हे उपबाजार आहेत. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नुसार सध्या कार्यरत आहे. सध्याचे संचालक मंडळ दि.१८/५/२०२३ पासून अधिकारावर येऊन मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड, रा चळे यांची सभापती म्हणून व मा.श्री.राजुबापू विठ्ठलराव गावडे, रा.पुळूज यांची उपसभापती माणून निवड झालेली आहे.

पंढरपूर बाजार समितीने सुरुवातीस भुसार शेतीमालाचे नियमनास सुरुवात करून जनावरांचे नियमन केले फळांची व भाजीपाल्यांची शेती फायदेशीर आहे, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळींब, केळी व इतर फळांच्या बागांनी लागवड मोठ्या प्रमाणात केली व या बाजार समितीने नंतर भाजीपाला, फळे व विडयाची पाने या वस्तुचे नियमन करून घेतले व दि.१/७/१९९५ रोजी कृक्षि दिनाचे मुहुर्तावर कर्मयोगी श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मालक यांचे शुभहस्ते या बाजार समितीचे बाजार आवारात उघड लिलाव पध्दतीने विकी व्यवस्था सुरू केलेली आहे. तर बेदाणा सौदे कामकाज कर्मयोगी श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मालक यांचे शुभहस्ते दि.९/५/१९९७ रोजी सुरू केलेले आहे.

तसेच डाळींब या शेतीमालाचे सौदे कामकाज दि.१०/११/२००७ रोजी कर्मयोगी श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मालक यांचे शुभहस्ते सुरू केलेले आहेत. डाळीयाची विकी प्रती किलो प्रमाणे वजनावर करणारी पहिली बाजार समिती आहे.

धान्ये, बेदाणा, कांदा, लिंबु, फळे, केळी, डाळींब, बोर, भाजीपाला व विडयाची पाने ड यांचे सौदे वेगवेगळे काढले जातात. सौद्या नंतर अनुज्ञप्तीधारी तोलारा कडुन वजने केली जातात व त्याप्रमाणे आडत्या शेतकरीप‌ट्टी तयार करून विक्रेत्यास त्याच्या मालाची रक्कम अदा करतो. इतर शेतीमाला पैकी जनावरे व वैरण यांची विकी आपआपसातील वाटाघाटीने होते

प्रत्येक वर्षातील कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यातील यात्रा कालावधी मध्ये जनावरांचे मोठे बाजार मौजे वाखरी येथे भरतांत, प्रत्येक वर्षी माघ यात्रेमध्ये बाजार समिती जनावरांचे प्रोत्साहनपर प्रदर्शन भरविते. बाजार समितीमध्ये भरविलेल्या या प्रोत्साहनपर प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट खिलार गाय, बैल, म्हैस, रेडा आणि संकरीत गाई करिता चांगली बक्षीसे वाटुम शेतकऱ्यांना सन १९६४ पासुन प्रोत्साहीत केलेले आहे. तसेच आषाढी यात्रा २०१६ पासुन सोलापूर जिल्हयाचे आमदार मा.श्री. प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य पातळीवरील कृषि प्रदर्शन भरविले जाते व भव्य शेतकरी मेळावा घेतला जातो. या कृषि प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते करण्यांत आले

अहवाल सालामध्ये या परिसरात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. एकुण आलेल्या शेतमालापैकी कांही प्रमाणात सहकारी संस्थेने नियमित शेतीमाल हाताळला आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे धोरणानुसार मका, हरभरा व सोयावीन या शेतमालाचे शासकीय हमी दराचे खरेदी केंद्र चालविले आहे, शेतमाल तारण कर्ज योजना राबविली आहे, कृषि पणन मित्र मासिकाचे वर्गणीदार केलेले आहेत. वृक्षारोपण व रक्तदान शिबीर घेतलेले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांकरिता कुस्ती स्पर्धा घेतलेली आहे तसेच बाजार समिती राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेची सभासद झालेली आहे.

बाजार समितीस उत्कृष्ठ कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांचे राज्य पातळीवरील कै. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार सन २०१७, सन २०१८ व सन २०२५ मध्ये मिळालेले आहेत.

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पा (स्मार्ट) अंतर्गत मा. पणन संचालक साहेब, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सन २०२३-२०२४ करिताची महाराष्ट्र राज्याची वार्षिक कमवारी जाहिर केली. यामध्ये पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने पायाभुत सुविधा व इतर सेवा सुविधा, आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज व इतर निकषांमध्ये पात्र ठरत १५५.५ गुण प्राप्त करीत राज्यात ५ वा क्रमांक, पुणे विभागात २रा कमांक तर सोलापुर जिल्हयात १ ला क्रमांक पटकाविला आहे.